वाचा:
‘हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठं आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावानं क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता, त्यांच्या नावाला विरोध असण्याचं कारणच नाही. त्यांचं नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे, परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणं हे हीन पातळीच्या राजकारणाचं दर्शन घडवतं,’ असं पटोले यांनी म्हटलं आहे. ‘राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या नावानं असलेल्या या पुरस्काराच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचं देशाच्या विकासातील योगदान व कोट्यवधी लोकांच्या मनातील स्थान मोठं असून अशा पद्धतीनं तसूभरही कमी होणार नाही,’ असंही पटोले म्हणाले.
वाचा:
‘राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचं नाव देता आलं असतं परंतु सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं गेलं. खरं तर राजीव गांधी यांचं नाव बदलल्यानं आश्चर्य वाटत नाही, ही कृत्ती भाजप व संघाच्या द्वेषमूलक वृत्तीतून आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूद कमी करायची आणि दुसरीकडं आपलं सरकार क्रीडा क्षेत्र व खेळाडूंचं किती हित जपतं हे दाखवण्यासाठी असं केविलवाणं काम करायचं, यातून क्रीडा क्षेत्राचा अथवा खेळाडूंचा कोणताच फायदा होणार नाही, असंही पटोले म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times