मुंबई: मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेली लोकल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. लोकलचा संबंध थेट नोकरी व पोटापाण्याशी असल्यानं सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विरोधी पक्षांनीही आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री व पर्यावरण मंत्री यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे. ()

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘करोनाचे निर्बंध शिथील करताना काही बाबतीत आपण अधिक जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात लसीकरण बऱ्याच प्रमाणात झालं आहे. तरीही तिथं करोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या जिवाची काळजी घेत आहे हे इथं लक्षात घेतलं पाहिजे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले. ‘रेल्वे प्रवासाबाबत दोन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना केवळ लोकल ट्रेनमध्येच नव्हे, इतर ठिकाणीही कशा प्रकारे सूट देता येईल यावरही चर्चा सुरू आहे,’ असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

वाचा:

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा अद्यापही सुरू झालेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे. त्याचा मोठा फटका मुंबईतील अर्थचक्राला व सर्वसामान्य मुंबईकरांना बसत आहे. अनेक छोटे-मोठ उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकऱ्या असलेल्या लोकांना कार्यालयात पोहोचणं कठीण झालं आहे. त्यामुळं सरकार आता अधिक वाट न पाहता लोकल सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोकांची ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपनं आंदोलनही सुरू केलं आहे. सर्वसामान्यांचाही आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तरी प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी पुढं आली आहे. त्याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल, असं आदित्य ठाकरे यांनी आज सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here