मला लोकांची चिंता आहे, लोकांचा जीव महत्वाचा आहे, असे सांगत आपण सध्यातरी निर्बंधांवर ठाम असल्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केली. मात्र, हॉटेल मालक संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आठवड्याभरात परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हॉटेल व्यवसायिकांना निर्बंधात शिथिलता न मिळाल्यामुळे राज्याभर हॉटेल मालकांमध्ये मोठी नाराजी होती. ठाण्यातील उपहारगृहांच्या मालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून उपहारगृहे बेमुदत बंद ठेवली जाणार आहेत. या बरोबरच कल्याणमधील हॉटेल व्यावसायिकांनीही हॉटेल बंद ठेवण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसियांकाच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉंरंटंस असोसिएशन – आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपल्याला सर्व गोष्टी पुर्वी प्रमाणेच सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरु करायच्या आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामध्ये आऊटडोअर म्हणजेच मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर अशा गोष्टींबाबत सावधपणे पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनची मोठी गरज भासली. पुढे तिसऱ्या लाटेतही रुग्ण संख्या वाढली, तर ऑक्सीजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही ऑक्सीजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार आहे. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्या यांचाही आढावा घेतला जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
टास्क फोर्सचे डॉ. जोशी यांनी हॉटेल व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, वातानुकूलन प्रणाली बंद करून हवेशीर व्यवस्था करणे, स्वच्छतागृहांची रचना याबाबतही सूचना केल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times