देशात ओबीसींच्या जनगणने मागणी मायावतींनी केली आहे. केंद्र सरकार देशातील ओबीसींची वेगळी जनगणना करावी. बसपाची ही मागणी जुनीच आहे. केंद्र सरकार या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलत असेल तर आम्ही सरकारसोबत आहोत. सरकारने पाऊल उचललं तर बसपा पाठिंबा देईल. संसदेत आणि संसदेबाहेर बसपा सरकारला समर्थन देईल, असं मायावती यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नितीशकुमार यांनीही जातीनिहार जनगणनेची मागणी केली आहे. यासंदर्भात नितीशकुमार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. पंतप्रधान मोदींकडे यामुद्द्यावर चर्चेसाठी नितीशकुमार यांनी पत्रातून भेटीची वेळ मागितली आहे.
देशात यापूर्वी १९३१ मध्ये जातीनिहाय जनगणना झाली होती. या आकड्यांच्या आधारावर देशातील ओबीसींची लोकसंख्या ही ५२ टक्के आहे. जातींचे आकडे नसल्याने मंडल आयोगाला काम करण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यावेळी आयोगाने पुढील कुठलीही जनगणना होईल त्यात जातीनिहाय लोकसंख्येची आकडेवारी गोळा केली जावी, असं आयोगाने शिफारशित म्हटलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times