म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबादहून देगलूरला (जि. नांदेड) येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसची दोन चाके निखळली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. मात्र मध्यरात्री तीन वाजता हा प्रकार घडूनही परिवहन मंडळाची मदत पहाटे पाच वाजता पोचली. तोवर प्रवासी चालक, वाहक बसमध्येच बसून होते. (the the )

सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की देगलूर आगाराची बस (क्रमांक एम एच ०९ एफ एल १०५९) गुरुवारी रात्री अकरा वाजता हैदराबादहून निघाली. बसमध्ये प्रवासी संख्या कमी होती. रात्री तीनच्या सुमारास बस देगलूरपासून दहा किलोमीटर असलेल्या बिचकुंदाजवळ आली. बिचकुंदा ते मेनूर दरम्यान चालत्या बसची मागच्या बाजूची दोन चाके निखळली. चालकाने प्रसंगावधान राखून बसला नियंत्रणात आणले. त्यामुळे अनर्थ टळला.

क्लिक करा आणि वाचा-
रात्री तीनची वेळ रस्त्यावर बस बंद पडली. तातडीने देगलूर आगाराला संपर्क साधून मदत मागण्यात आली. पण सकाळी पाच वाजता आगारातील मेकॅनिक घटनास्थळी पोचले, दुरुस्ती केली. त्यानंतर बस देगलूरला पोचली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here