सीरम इन्स्टिट्यूटला दिलेल्या सवलतींबद्दल पुनावाला यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. देशात करोनावरील कोविशिल्ड लसीची मागणी पाहता लसीचे उत्पादन वाढण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत, असं पुनावाला म्हणाले. पुनावाला यांनी शुक्रवारी संसेद गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास ३० मिनिटं चर्चा चालली. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे आणि आमच्यावर कुठलेही आर्थिक संकट नाहीए. सर्व प्रकारचे सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत, असं पुनावाल म्हणाले.
करोनावरील कोवोवॅक्सची लस लहान मुलांसाठी पुढच्या वर्षी पहिल्या तिमाहीत लाँच होण्याची आपेक्षा आहे. पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीत ही लस मुलांसाठी लाँच होण्याची शक्यता आहे. तर प्रौढांसाठी कोवोवॅक्सची ही लस ऑक्टोबरमध्ये लाँच केली जाईल. पण हे डीसीजीआयच्या मंजुरीवर अवलंबून आहे. इतर लसींप्रमाणे दोन डोस असलेली लस आहे. या लसीची किंमत लाँचवेळी निश्चित केली जाईल, असं पुनावाला यांनी सांगितलं.
अदर पुनावाला यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर मांडवीय यांनी ट्वीट केलं. करोनाचा संसर्ग कमी करण्यात पुनावाला यांच्या भूमिकेचं कौतुक केलं. तसंच लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचे सहकार्य यापुढेही कायम राहील, असं आश्वासन आपण दिल्याचं मांडवीय यांनी ट्वीटमधून सांगितलं. गेल्या महिन्यात तज्ज्ञांच्या एका पॅनेलने काही अटींसह २ ते १७ वर्षांच्या मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यास सीरमला परवानगी देण्याची शिफारस केंद्राला केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times