राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलण्याचा निर्णय जनतेच्या मागणीचा विचार करून घेतला गेला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं मोदींना बोचरा टोला हाणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सरकारच्या या निर्णयावर ट्वीट केलं आहे.
वाचा:
‘जनतेची मागणी’ असल्यामुळं खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं आहे, असं मोदी म्हणतात. चांगलं आहे. पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा… युवकांना रोजगार द्या… महिलांना सुरक्षा द्या… शेतकऱ्यांना सन्मान द्या… राजीनामा द्या… या देखील जनतेच्या मागण्या आहेत. त्यावर मोदी सरकार कधी निर्णय घेणार?,’ असा सवाल चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.
खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, त्यासाठी सरकार देत असलेली कारण अनेकांना पटलेली नाहीत. गांधी-नेहरू या नावाच्या तिरस्कारातून मोदी सरकारनं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. खेल रत्न पुरस्काराला राजीव गांधी यांचं नाव चालत नसेल तर अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव का? त्या स्टेडियमला एखाद्या महान क्रिकेटपटूचं नाव का नाही? मोदींचं क्रीडा क्षेत्रात काय योगदान आहे?,’ असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times