मुंबईः कस्तुरबा रुग्णालयात () एलपीजी गॅसची गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. गॅसची गळती नेमकी कशामुळं झाली?, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये.

सकाळी ११च्या दरम्यान एलपीजी गॅसची गळती झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत रु्गणालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयानं तातडीने पावलं उचलत रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी गॅसची गळती झाली आहे तिथे जास्त रुग्ण नव्हते. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे.

वाचाः

ही नेमकी कशामुळं झाली हे मात्र अद्याप कळलेलं नाही. डॉक्टर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाल्याचे समजताच इमारतीतील सर्व रुग्णांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. रुग्णांना बाजूच्या इमारतीत हलवण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवान आपलं काम करत आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

66 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here