नाशिकः अहमदनगरमध्ये मोठ्या संख्येनं आढळणारी रुग्णसंख्या लगतच्या नाशिक शहरासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. यासाठी नाशिक प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ()

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्हा राज्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांमधील निर्बंध काहीसे शिथील केले असताना नगर जिल्ह्यात मात्र निर्बंधांत शिथीलता न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ४ ऑगस्टला अहमदनगर शहरात ३४ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ७८५ रूग्ण बाधित आढळले आहेत. यावरून नगर जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग लक्षात येतो. पश्चिम महाराष्ट्रासह शेजारील अहमदनगर जिल्ह्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेचे संकेत देणारी आहे. करोनाची तिसरी लाट नाशिकच्या दारापर्यंत येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने नाशिक जिल्ह्याधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक केलं आहे. तसंच, नाशिक जिल्ह्यात आटोक्यात आलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगरमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचाः

सिन्नरमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामागे अहमदनगर कनेक्शन कारणीभूत ठरत असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. सिन्नर तालुक्यातील रहिवाशांचे बहुतांश व्यवहार संगमेनरमध्ये चालतात. वावी आणि शहा येथील रहिवाशांचे देखील शिर्डी, कोपरगाव, लोणी या भागात कामानिमित्त येणे जाणे असते. त्यामुळं नाशिक जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

वाचाः

जिल्हा पुन्हा रुग्णवाढीकडे

नाशिक जिल्ह्यात ३१ जुलैनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच १०० हून अधिक जण करोना बाधित आढळले. दिवसभरात ११६ रुग्णांना करोनासंसर्गाचे निदान झाले असून यापैकी ७९ जण ग्रामीण भागातील आहेत. निर्बंध शिथिलतेनंतर रुग्णसंख्या वाढत जाणे ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दिवसभरात ९९ रुग्ण उपचारांद्वारे करोनामुक्त झाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here