हा प्रकार अमरावती शहरातील नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्रीच्या जेवणात मटण बनवायचे, असे सांगून पती बाहेर गेला. काही वेळानंतर पती घरी आला व त्या वेळी पत्नीने जेवण तयार असल्याचे सांगितले. पत्नीने जेवणात मटण बनवले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या कारणावरून त्यानं पत्नीसोबत वाद घातला. त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, ‘आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही असं म्हणून तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असं म्हणत तिला तलाक दिला. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाचा:
रागावलेल्या पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न पीडित पत्नीनं केला. मात्र, तो ऐकून घ्यायला तयार नव्हता. उलट तुझ्या भावाला मारेन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली. या प्रकारामुळे अखेर पीडित महिलेने नागपुरी गेट पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times