राजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरुच आहे. गोकुळपुरीत झालेल्या हिंसाचारात पोलिस कॉन्स्टेबलसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जाफराबाद आणि मौजपुरमध्ये सोमवारी सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये हिंसाचार उसळला होता. दिल्लीत आजही तणाव कायम आहे.

>> अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक, तीन जवान जखमी

>> काल घडलेल्या हिंसाचारात जखमी झालेले अमित शर्मा यांच्यावर शस्त्रक्रिया; प्रकृती धोक्याच्या बाहेर

>> करावल नगरमध्ये आंदोलनकर्त्यांकडून गाड्यांची जाळपोळ

>> दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावली तातडीची बैठक; हिंसाचार झालेल्या भागांतील अधिकारी व आमदार उपस्थित राहणार

>> ब्रह्मपुरी भागात दोन गटात दगडफेक

>> दिल्लीतील इशान्य भागात तणाव

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here