: लोखंडी पाईपने मारहाण केल्याने गोळेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश गणपत जाधव (वय ३५) यांचा मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे कॅनॉलनजीक ही घटना घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तपास करून दोन संशयित आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

उसने घेतलेले ३१ हजार रुपये परत न दिल्याने मंगेश जाधव यांचा खून केल्याचे संशयितांनी सांगितलं आहे.

देवानंद संजय गोरे (वय १८) व कमलेश मधुकर यादव (वय १९, दोघेही रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. मंगेश जाधव हे दि. ४ ऑगस्टपासून बेपत्ता होते. कुमठे गावच्या हद्दीत धोम धरणाच्या शेजारून जाणार्‍या रस्त्यावर मंगेश जाधव यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. डीवायएसपी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विशाल कदम व कर्मचार्‍यांचे पथक तपास करत होते. या तपास पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण याद्वारे गुन्ह्यात सहभागी असणार्‍या देवानंद व कमलेश यांची नावे निष्पन्न झाली. यानंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

मंगेश जाधव याला देवानंद व मधुकर यांनी ३१ हजार रूपये उसने दिले होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही मंगेश पैसे परत देत नसल्याने मंगेशचा काटा काढण्याचे दोघांनी ठरवले. त्यानुसार दि. ४ रोजी दोघांनी मंगेश याला धोम कॅनॉलच्या बाजूला नेले. याठिकाणी त्याला लोखंडी पाईपने मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले, अशी कबुली दोन्ही संशयितांनी दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

दरम्यान, या कारवाईत पो.नि. अर्चना शिंदे, सपोनि संजय बोंबले, गणेश कड, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सावंत, हवालदार कमलाकर कुंभार, प्रमोद चव्हाण, मिलिंद कुंभार, धनंजय दळवी, अमोल सपकाळ, सनी आवटे, साहिल झारी, सागर गायकवाड, सागर जाधव यांनी सहभाग घेतला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here