अरूण राठोड (५५) असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेत तो कार्यरत आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारानेही तो यापूर्वी सन्मानित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो विद्यार्थिनीवर अत्याचार करत असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार ग्रामस्थांना माहीत झाल्यानंतर शिक्षकाला पकडून शाळेत डांबले. त्यानंतर त्याला बेदम चोप दिला.
विद्यार्थिनीवर अत्याचार करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेची महिती ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. गावकऱ्यांच्या मारहाणीत शिक्षक गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची आहे. याबाबत यवतमाळच्या उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी माहिती दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times