: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटपूर या गावात ही घटना घडली. आरोपी मुलाने मृतकाची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने छिन्न विछिन्न केला.

शिरखेड पोलिसांनी करणाऱ्या आरोपी मुलाला चार तासातच अटक करून हत्येचा छडा लावला आहे.

रमेश माणिकराव अकोटकर असं हत्या झालेल्या बापाचे नाव आहे. रमेश हा मागील काही दिवसांपासून स्वतःच्या ८२ वर्षीय वृद्ध आईकडे वाईट नजरेने पाहत होता. त्यामुळे आपल्या बापाचे हे वाईट कृत्य पाहून आरोपी मुलगा संदीप अकोटकर व मृतक वडील रमेश आकोटकर या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यातच आरोपी संदीप याला संताप आला आणि रागाच्या भरात त्याने शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान आपल्या पित्याची निर्घृण हत्या केली.

दरम्यान, घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी संदीप आकोटकर हा घटना स्थळावरून फरार झाला होता. मध्यरात्री पोलिसांनी शोध मोहीम राबवून अवघ्या चार तासात त्याला अटक केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here