: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यात कशेडी इथं आज ७ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास ट्रकला भीषण अपघात झाला आहे. आंबा पॉइंट येथे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक दरडीवर आदळून झालेल्या अपघातात चालक व क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रक नंबर आर.जे.१४ जी.एच,९७१२ हा लोखंडी पाईप घेऊन जात असताना ट्रक चालक महमद मुन्ना सिंग (वय ४०, राहाणार फ़िरोजपूर, राज्य हरियाणा) याचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक स्त्याच्या डावीकडे असलेल्या दरडीवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच क्लिनर महंमद आशपाक वय ३० याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे.

या भीषण अपघातात ट्रकचंही मोठं नुकसान झालं आहे. जखमींना उपचारासाठी खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आलं आहे. अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी मृत्यंजय मदत ग्रुपचे शिवा यादव, प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली.

दरम्यान, एएसआय समेल सुर्वे, हेड कॉन्टेबल रामागडी, पोलिस नाईक कुंभार, शिवा यादव, विलास पाटणे, महेंद्र रागले आणि कशेडी येथील ग्रामस्थ यांच्या मदतीने अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here