वाचा:
रिदाना तौफिक शेख (वय ३५), यासीन हारून शेख (वय ३५), (वय ४१, सर्व रा. कुंभारी नवीन विडी घरकुल, ता. दक्षिण सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेजण धार्मिक कार्यासाठी बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे गेले होते. धार्मिक कार्य उरकून परत येत असताना ते दुपारी जवळच असलेल्या तलावात गेले. तेथे पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण पाण्यात बुडाले.
वाचा:
तलावाजवळच असलेल्या ग्रामस्थांनी तिघांनाही पाण्याबाहेर काढले असता ते बेशुद्धावस्थेत होते. याबाबत सोलापूर तालुका पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि त्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि तिघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु, उपचारापुर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times