स्थानिक अफगाण खासदार मोहम्मद करीम जावजानी यांनी सांगितले की, प्रांतातील १० पैकी नऊ जिल्ह्यांवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानी राजधानी शेबेरगनमध्ये दाखल झाले. तालिबानने शेबेरगनमध्ये मात्र, तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला नसल्याचे अफगाणिस्तान सरकारने म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील इतर राज्यांच्या राजधानींनादेखील धोका असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा:
तालिबानने शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नीमरोज प्रांताची राजधानी जारांजवर ताबा मिळवला होता. तर, राजधानीमध्ये तालिबानींसोबत अद्यापही लढाई सुरू असल्याचे सरकारने म्हटले. ही तर फक्त सुरुवात असल्याचे म्हणत तालिबानने सरकारला इशारा दिला आहे. जरांजचे सामरीक महत्त्व अधिक असून याची सीमा इराणला लागून आहे.
अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील भागात अफगाण सैन्याचा जोरदार प्रतिकार सुरू आहे. उत्तरेकडे मात्र तालिबानने सर ए पूल प्रांताची राजधानी ताब्यात घेतली आहे. या भागातील बराचसा भाग तालिबानने व्यापला आहे. अमेरिका आणि ‘नाटो’चे सैन्य अफगाणिस्तानातून परत जाण्यास सुरुवात झाल्यापासूनच तालिबानने उचल खाल्ली आहे. अफगाणिस्तानचे लष्कर आणि हवाई दल त्यांना प्रत्युत्तर देत आहेत; मात्र या संघर्षात निर्दोष नागरिकांचे बळी जात आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times