लाहोर: पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह ५० जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या या हल्ल्याप्रकरणी १५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते.

लाहोरपासून ५९० किमीवर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. स्थानिक मदरशामध्ये लघवी करणाऱ्या आठ वर्षीय मुलाची सुटका केल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या आधारे मुख्य आरोपीसह ५० जणांना अटक करण्यात आली आहे. मंदिरात तोडफोड झाल्याची घटना लाजीवरवाणी असल्याची भावना प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुझडार यांनी व्यक्त केली. अशाप प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, असे ते म्हणाले. मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील गणेश मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध केला होता. या प्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. पोलिसदेखील या प्रकरणात दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इम्रान खान यांनी दिले.

या आधीही हिंदू मंदिरावर हल्ले

पाकिस्तानमध्ये मागील हिंदू मंदिरावर याआधीही हल्ले झाले आहेत. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायावर मागील काही काळात अत्याचारात वाढ झाली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस खैबर पख्तूनख्वा प्रातांत एका धर्मांध मौलवीच्या नेतृत्वात हिंदू मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. हिंदू संत परमहंस महाराज यांच्या मंदिराला आग लावण्यात आली होती. ही घटना करक जिल्ह्यातील तेरी भागात झाली. तर, मार्च महिन्यात रावळपिंडी शहरात १०० वर्षाहून अधिक जु्न्या हिंदू मंदिरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना हल्ला झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here