येवला : येवला तालुक्यातील राजापूर इथे येवला- नांदगाव रस्त्यावर वाघ वस्तीजवळ बस व अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दोनजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

नांदगाव आगाराची परळी – बीड – नांदगाव ही बस (एमएच -१४,बीटी-४१७५) येवल्याकडुन नांदगावकडे जाणारी जात असतांना नांदगावकडून येणारी अल्टो कार (एमएच १५,इबी ९८०७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. बसचालक दशरथ शेवाळे यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला नेली. या प्रयत्नात बस नालीत गेली. बसचालकाच्या या एका कटमुळे मोठी दुर्घटना टळली.

बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी होते. पण बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. यात अल्टोमधील राजेंद्र घायाळ (नैताळे ता. निफाड) व सतिष (लाला) जमधडे (रा.बल्हेगाव ता.येवला) हे दोन जण गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील प्रवाशी हि किरकोळ जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी येवला येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुराशे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here