बोगोाटा: काही ठिकाणे हे रात्रीच्या वेळी अधिक भीतीदायक वाटत असतात. ही ठिकाणे भीतीदायक वाटण्याची वेगवेगळी कारणे असतात. मात्र, सुरक्षित समजली जाणारी सरकारी कार्यालयांमध्येही असे भीतीचे वातावरण असेल तर त्याची चर्चा होते. महापौरांनी अजब दावा केला आहे. त्यांच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाला एका भूताने मारहाण केली असल्याचा दावा त्यांनी केला. या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी सीसीटीव्ही फूटेजही जाहीर केले.

कोलंबियातील आर्मेनिया शहराच्या महापौरांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आर्मेनिया शहराचे महापौर जोस मॅन्युअल रिओय मोरालेस यांनी म्हटले की, रात्रीच्या वेळी एका भूताने त्यांच्या ऑफिसवर हल्ला केला. फेसबुकवर व्हिडिओ शेअर करताना मोरालेस यांनी म्हटले की, आज मी एक व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे. एक अदृष्य शक्ति असते असे मला वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांनी फेसबुकवर म्हटले की, कोणीही आपली शांतता चोरू शकत नाही. आपण आपल्या देवाच्या हाती सुरक्षित आहोत. लोकांनी शांत राहावे आणि देवाकडे प्रार्थना करण्याचे आवाहन महापौरांनी केले. या असामान्य शक्तिला रोखण्यासाठी स्थानिक बिशप आणि इतर धार्मिक नेत्यांना कार्यालयात पाचारण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

सुरक्षा रक्षकाला धक्का

महापौरांनी शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, एका सुरक्षा रक्षकाला भिंतीवर आपटताना दिसत होते. एखाद्या अदृष्य शक्तीने त्याला धक्का दिले असल्याचे भासते. त्यानंतर तो सुरक्षा रक्षक जमिनीवर पडलेला दिसून आला.

महापौरांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांची थट्टा उडवली आहे. हा व्हिडिओ बनावट असल्याचेही अनेकांनी म्हटले. तर, काहींनी ही घटना सत्य असू शकते असे म्हणत महापौरांच्या दाव्याला पाठिंबा दर्शवला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here