मुंबई– बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मिलिंद नेहमीच त्याचे फिटनेसचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मिलिंदचे व्हिडिओ कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरतात. परंतु, या वेळेस मिलिंदने शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहत्यांनीही तोंडात बोटं घातली आहेत. हा नक्की काय प्रकार आहे, असं म्हणत सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडिओत मिलिंद चक्क पाण्याची बादली घेऊन भर रस्त्यात आंघोळ करत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड वायरल झाला आहे.

मिलिंदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात मिलिंद पावसात रस्त्याच्या मध्ये पाण्याची बादली घेऊन बसला आहे आणि भांड्याने बादलीतील पाणी स्वतःच्या अंगावर ओतत आहे. सोबतच ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए’ हे गाणं देखील गात आहे. मिलिंदने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘चित्रीकरण खूप छान असतं! गरम पाणी, थंड पाऊस, पावसाळी रात्र, जे लोक विचारतात की मी व्यायाम आणि धावणं याशिवाय आणखी काय करतो, त्यांच्यासाठी सांगतो, नवा चित्रपट येतोय.’ नव्या चित्रपटाबद्दल माहिती देण्याची ही पद्धत मिलिंदच्या चाहत्यांना भलतीच पसंत पडली आहे.

मिलिंदच्या व्हिडिओवर प्रचंड लाइक आणि कमेंट आल्या आहेत. मिलिंदच्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, ‘काय हाल केलेत लॉकडाउनने लोकांचे’ तर आणखी एका युझरने लिहिलं, ‘तुमचे असे निरनिराळे कारनामे पाहायला मजा येते.’ मिलिंद बॉलिवूडमधील टॉपच्या मॉडलपैकी एक आहे. मिलिंदने स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. अनेक चित्रपट आणि वेबसीरिज मधून मिलिंद यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here