काही दिवसांपूर्वी राज्यातील हॉटेल मालक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हॉटेलच्या वेळा वाढवाव्यात अशी मागणी केली होती. शिवाय लोकल सुरू करा अशीही मागणी आहे. विरोधी पक्षाने देखील लोकलसाठी आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता आहे.
राज्यातील संसर्ग नियंत्रणात येत असून मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये हे नियंत्रण बऱ्यापैकी दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी काहीशी चिंताजनक स्थितीही आहे. काही भागात डेल्टा प्लस चे रुग्णही आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या टास्कफोर्सची बैठक घेत आहेत.
आता सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. आपण काय ‘कमरेमे बंद है और चाबी खो जाए’ अशी आपली स्थिती आहे. चावी आपल्या हातात आहे. करोनाची परिस्थिती बघून ती चावी किती फिरवायची हे पाहून त्याबाबत निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले होते.
मला एका गोष्टीचे समाधान वाटले. मला राज्यातील हॉटेल चालक आणि मालक येऊन भेटले. मी त्यांनाही सांगितले की थोडसं धीराने घ्या, दमाने घ्या, एक एक पाऊल आपण पुढे टाकत आहोत आणि ते टाकावेच लागणार आहे. पण हे पाऊल टाकत असताना आपले पाऊल चुकीचे तर पडत नाही हे पाहावे लागणार आहे. करोना मुंबई आणि इतर ठिकाणी बराचसा कमी झालेला आहे. पण तो करोना उलटणार तर नाही ना हे पाहावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट अचानक पण तीव्रतेने आली आणि यात जी धावपळ झाली त्या आठवणीही आता नकोशा वाटतात.
हे लक्षात घेता येत्या काही दिवसात आपण थोडी थोडी खात्री पटवत निर्णय घेणार आहोत. सुविधा किती पुरी पडेल किती अपुरे पडतील. याचा विचार करून हॉटेल्स आणि लोकल सेवा सुरू करण्याबाबत आपण विचार करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times