रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा कडक नियम- अजित पवार
हा निर्णय घेण्यात येत असला तरी पुण्याचा पॉझिटीव्हीटीचा दर जर ७ टक्क्यांहून अधिक झाला, तर ही मुभा पुन्हा बद करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुणेकरांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे. सर्व नियम पाळलेच पाहिजे. दुकानांचे मालक आणि सेल्समन हे बऱ्याचदा मास्क वापरत नाही ही तक्रार आहे. मात्र नियमांमध्ये शिथिलता हवी असेल तर खबरदारी घेतली पाहिजे ही मी नम्र विनंती करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
ग्रामिण भागात १३ तालुक्यांमध्ये लेवल ३ ची नियमावली सोमवारपासून लागू करण्यात आली आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराप्रमाणे ग्रामीणलाही सूट द्या अशी मागणई होती. मात्र पॉझटीव्हीटीता दर सरासरी ५ असल्याने तसा निर्णय घेता येत नसल्याचे ते म्हणाले.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये काय आहेत नवे नियम?
> पुण्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार
> पुण्यातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील
> हॉटेल चालकांना करोना लशीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक
> पु्णे आणि पिंपरी चिंचवडमधील मॉल्स रात्री ८ पर्यंत सुरू राहणार
> लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश
>उद्याने नियमित वेळेनुसार सुरू राहणार
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times