अर्जुन कपूरनं त्याच्या सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट करत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं लिहिलं, ‘हे खुपच दुःखद आणि लाजिरवाणं आहे. २०२१मध्ये अशा प्रकरचे मथळे दिले जात आहेत. अर्थातच ती चांगलं कमावते आणि ती इथंपर्यंत पोहोचली आहे त्यासाठी तिनं अनेक वर्ष काम केलं आहे. याची तुलना कोणाशीही अजिबात चांगलं नाही. अगदी माझ्या कामाईशीही तिची तुलना व्हायला नको.’
काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका अरोराबद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, ‘ज्या प्रकारे एक महिला म्हणून तिनं वयाच्या २० व्या वर्षापासून आतापर्यंत काम करून आयुष्यात स्वतःचा वेगळा मार्ग तयार केला आहे ते कौतुकास्पद आहे. ती एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असण्यासोबतच स्वावलंबी स्त्री आहे. मी तिला कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार करताना ऐकलेलं नाही. नकारात्मक बोलताना ऐकलेलं नाही. ती कोणाचाही जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलण्याचा प्रयत्न करत नाही. ती नेहमीच सन्मानपूर्वक स्वतःचं काम करते. मी प्रत्येक दिवशी तिच्याकडून काही ना काही शिकत असतो.
अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडच्या काळात त्याचे ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘सरदार का ग्रँडसन’ हे चित्रपट रिलीज झाले. आगामी काळात तो ‘भूत पुलिस’ आणि ‘एक विलन रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times