: ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली येथील अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीपात्राच्या शिवणी घाटावर या प्रेमी युगुलाने आपलं जीवन संपवलं. सदर घटना शनिवारी उघडकीस आली.

दोघांनीही एकमेकांच्या हाताला दोर बांधून नदीपात्रात उडी घेतल्याने त्याच अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.

ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली येथील स्वाती दिलीप मेश्राम (१५) व आशिष प्रभू मेश्राम (१७) हे दोघेही मागील २ दिवसांपासून बेपत्ता होते. दोघांच्या पालकांकडून ही मुले बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीनंतर ब्रम्हपुरी पोलिसांनी शोध मोहीम राबविली. दोन दिवस शोधाशोध झाली. पोलिसांना मोबाईलवरून वडसाजवळ त्याचा ठाव-ठिकाणा मिळाला. त्याच वेळी आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर त्यांचे मृतदेह आढळून आले. सदर आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

दरम्यान, अल्पवयीन तरुण-तरुणीने आपले जीवन संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here