ठाण्यात आढळले डेल्टा प्लसचे ४ रुग्ण
महानगरपालिकांचा विचार करता ठाणे महापालिका क्षेत्रात या नव्या विषाणूचे ३ तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ रुग्ण आढळला आहे. या रुग्णांमध्ये २५ वर्षांखालील २ रुग्ण, तर ५६ वर्षांखालील २ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
क्लिक करा आणि वाचा-
डेल्टा प्लसच्या या चारही रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र हे रुग्ण ज्या लोकांच्या संपर्कात आले आहेत, अशा सर्वांची तपासणी केली जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
डेल्टा प्लसचे रुग्ण ४५ वरून ४९ वर
राज्यात एकूण ४५ डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र आता ठाणे जिल्ह्यात आणखी ४ रुग्ण आढळल्याने ही संख्या आता ४९ वर जाऊन पोहोचली आहे. यात २९ पुरूष आणि २० महिलांचा समावेश आहे. ठाण्याव्यतिरिक्त राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि रत्नागिरीत आतापर्यंत डेल्टा प्लसचे व्हेरिएंट आढळले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटसची ही स्थिती असली तरी देखील नागरिकांनी घाबरून न जाता योग्य वेळी रुग्णालयात दाखल व्हावे,असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times