वाचा:
येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरू झाली असून मराठा समाजाने सरकारकडे केलेल्या मागण्यांचा जिल्ह्यातील समन्वयकांकडून विषयवार आढावा घेतला जात आहे. या बैठकीत आज संभाजीराजे यांनी मार्गदर्शन केले व आक्रमक भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार असून पुढचं आंदोलन मंत्रिमंडळाच्या विषयक उपसमितीचे अध्यक्ष यांच्या नांदेडात करण्याची घोषणा संभाजीराजे यांनी यावेळी केली. याआधी कोल्हापुरातून या आंदोलनाला सुरुवात झाली असून नाशिकमध्येही आंदोलन करण्यात आले आहे. सरकारच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
वाचा:
राज्यातील कोविड स्थिती आणि काही दिवसांपूर्वीची पूरस्थिती पाहता आम्ही शांत राहिलो. परिस्थितीचं भान आम्ही राखलं पण आमच्या प्रश्नांचं काय, याचं उत्तर सरकारला द्यावंच लागणार आहे. जो वंचित आहे त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका असून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हे सरकारने ठरवायला हवं. ती सरकारचीच जबाबदारी आहे. त्यासाठी डोकं लावा, असा सल्ला संभाजीराजे यांनी दिला. मी मॅनेज होणारा नेता नाही, असे सांगताना माझ्यावर विश्वास ठेवा. आंदोलन करायचं की काय करायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवा. तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. तुम्ही सांगितलं तर मी उपोषणाला बसायलाही तयार आहे. तुम्ही सांगाल तितके दिवस मी उपोषणाला बसेन, असेही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times