मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबीयांचे शिवसेनेशी असलेले राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यातून स्वत: नारायण राणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव शिवसेनेवर व ठाकरे पिता-पुत्रांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करताना दिसतात. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्यानंतर माजी खासदार यांनी आता यांच्यावरही टीका केली आहे. ()

वाचा:

खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाचा धागा पकडून नीलेश राणे एक ट्वीट केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. केंद्र सरकारनं एम्पिरिकल डेटा द्यावा, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये ३७७ अंतर्गत केली. नीलेश राणे यांनी त्यावरूनच सुळे यांना टोला हाणला आहे. ‘३७७ अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देत नाही. तशी तरतूदच नाही. मग ह्या अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला?,’ असा सवाल नीलेश राणे यांनी केला आहे.

नीलेश राणे यांनी याआधी साखर कारखानदारी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. रोहित पवार यांनी या टीकेला उत्तर दिल्यामुळं या दोन्ही युवा नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगलेला महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्याशिवाय, अलीकडंच नीलेश राणे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. ‘अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे अर्थतज्ञ देखील सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं. अर्थमंत्री असूनही त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही,’ असं नीलेश राणे म्हणाले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here