मुंबईः शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, परिसरातील रस्ते, फूटपाथ आणि चौक कायमस्वरूपी आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदार निधीचा सर्वप्रथम वापर परिसरात होणार आहे. यावरुन मनसेनं शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

राज्य सरकारने शिवाजी पार्क परिसरात कायमस्वरुपी रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन मनसेनं शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ‘चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?,’ असा खोचक सवाल मनसेनं केला आहे.

वाचाः

मनसेचे नेते यांनी एक ट्वीट केलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात, ‘२०१२नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला आहे का? दुसर्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉइंट आणि आता राजसाहेबांच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?,’ अशी टीका संदीप देशपांडेंनी केली आहे.

दरम्यान, दरवर्षी दिवाळीत मनसेतर्फे शिवाजी पार्क मैदानाभोवती कंदील व दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाते. त्यामुळं राज्य सरकारकडून रोषणाई केली जाणार असल्यानं मनसेच्या रोषणाईचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसेच्या रोषणाईला शिवसेनेने हे उत्तर दिले असल्याची चर्चा आहे.

वाचाः
वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here