मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून काम करत असतात म्हणून विरोधी पक्षाचे नेते सातत्याने त्यांच्यावर टीका करत असतात. याही वेळेला भाजप नेते केशव उपाध्ये यांनी यावर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये ते म्हणतात, दोन डोस झालेला सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करेल पण दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. तसंच, गर्दी टाळण्यासाठी तसंही तुम्ही स्वतःच मर्सिडीझ चालवत असल्यानं बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाही. दोन डोस झालेल्यांना जे नियम, ते स्वतःही अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम, असा टोमणा त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, केशव उपाध्ये यांनीही सोमवारीही ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. जनतेचा दबाव आणि भारतीय जनता पार्टीचे आंदोलन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला खरा, पण तो घेताना त्यांनी नियम आणि अटींचा गुंता करून सोपा प्रश्न अवघड करून ठेवला आहे. वास्तविक त्यांनी सामान्यांना सहजपणे लोकलप्रवास करता येणार नाही, अशीच व्यवस्था करून ठेवल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times