अहमदनगर: पुत्रप्राप्तीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेले निवृत्ती देशमुख ऊर्फ यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओच यू ट्यूबवर सापडेनासा झाला आहे. त्यामुळं पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई करता येणार नसल्याचं जिल्हा आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.

सम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका प्रवचनात केल्याचा आरोप आहे. नगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीएनडी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती. इंदोरीकरांच्या वक्तव्याची शहानिशा करण्यासाठी विभागानं पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांच्या तपासाचा अहवाल आला असून असा कोणताही व्हिडिओ यू ट्यूबवर उपलब्ध नसल्याचं पोलिसांच्या सायबर सेलनं आरोग्य विभागाला कळवलं आहे. सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी आज ही माहिती दिली. ‘ज्या वर्तमानपत्रात या बाबतची बातमी आली होती, त्यांनाही नोटीस पाठवू न खुलासा मागविला होता. मात्र, तो अद्याप आला नाही
. त्यामुळं त्यांना पुन्हा पत्र पाठविण्यात येत असल्याचं मुरंबीकर यांनी सांगितलं. जोपर्यंत ठोस पुरावे येत नाहीत, तोपर्यंत इंदुरीकरांवर काहीही कारवाई करता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंदुरीकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

वाचा:

इंदुरीकर यांनी यापूर्वीच आरोग्य विभागाकडं आपली बाजू मांडली आहे. ‘असं कोणतंही वक्तव्य केलंच नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचा हा खुलासा समाधानकारक वाटत असल्याचं आरोग्य विभागानं आधीच स्पष्ट केलं होतं. आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे विभागानं आपली भूमिका मांडली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here