स्वप्नील शिंदे । मध्यरात्री रस्त्यात डीजे लावून धिंगाणा घालणाऱ्या युवकांना पोलिसांनी हटकले असताना शिवीगाळ, दमदाटी करीत संबंधित युवकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. कराड शहरातील बुधवार पेठेत ही घटना घडली. या प्रकरणी सोळवंडे टोळीतील १३ जणांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रद्युम्न ऊर्फ पद्या सोळवंडे (रा. बुधवार पेठ, कराड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पसार झालेल्या त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत असून रात्री उशिरापर्यंत आरोपींची धरपकड सुरू होती. या घटनेने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाचा:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंडी चौक ते बुधवार पेठ जाणाऱ्या मार्गावर शनिवारी मध्यरात्री काही युवक डीजे लावून धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात समजल्यानंतर रात्रगस्तीचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी रस्त्यावरच डीजे लावून काही युवक नाचत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. तसेच डीजे बंद करण्याची सूचना दिली. मात्र, पोलिसांना न जुमानता युवकांचा नाच सुरूच होता. पोलिसांनी ताकीद दिल्यानंतर युवकांनी पोलिसांना शिविगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच त्या ठिकाणची लाइट अचानक बंद करून पोलिसांवर दगड भिरकावले. त्यामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने आणखी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. मात्र, तोपर्यंत दगडफेक करणारे युवक पसार झाले होते. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी या प्रकरणी पोलिसांनी प्रद्युम्न ऊर्फ पद्या सोळवंडे याला अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित बाबर तपास करत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here