गांधी चौक पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आम्रपाली कांबळे या तरुणीचे ओळखीतील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी दोघांच्या लग्नाला होकारही दिला होता. मात्र काल तिने राहत्या घरी विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले.
मुलीने विषारी इंजेक्श टोचून घेतल्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर तिला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालाचे डॉक्टरांनी घोषित केले.
आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यातून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याबाबत मिरज गांधी चौक पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुलीच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times