वाचा:
तक्रारदार हे ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतात त्या चार शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. या मंजूर अनुदानाप्रमाणे शाळेतील ३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची पदनिश्चिती करून त्यांचे नोव्हेंबर २०२० पासून थकीत वेतन काढून देण्यासाठी तसेच मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे वेतन पुढे नियमित पुढे सुरू ठेवण्यासाठी यांच्यावतीने शिक्षक पंकज दशपुते यांनी तक्रारदाराकडे ९ लाखांची लाच मागितली. याबाबत एसीबीने केलेल्या पडताळणीमध्ये शिक्षणाधिकारी यांनी तडजोडीअंती आठ लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. तसेच पुढील व्यवहार त्यांचे चालक येवले यांच्याशी करण्याविषयी सांगितले. त्यानुसार मंगळवारी एसीबीने शिक्षणाधिकारी यांच्यावतीने तक्रारदाराकडून आठ लाखांची लाच स्वीकारताना येवले याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर वैशाली वीर आणि पंकज दशपुते यांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर या लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार आली होती. त्यानंतर ठाणे एसीबीने नाशिकच्या पथकाच्या मदतीने ही कारवाई केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times