मुंबई: मुंबईतील येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर या स्टेशनच्या विस्तारीकरणामध्ये विस्थापित झालेल्या रहिवाशांना कडून घरे देण्यात येत असून त्यातील लाचखोरीचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. घराचा ताबा देण्यासाठी विस्थापिताकडे दोन लाखांची लाच मागणाऱ्या एमएमआरडीएच्या सहायक समाज विकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कार्यालयात कार्यरत आहे. ( )

वाचा:

मार्गावरील रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर २०१७ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक निष्पाप प्रवाशांचे नाहक बळी गेले होते. पूल अरुंद असल्याने व पूल कोसळत असल्याची अफवा पसरल्याने ही भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर युद्धपातळीवर एलफिन्स्टन स्टेशनचे विस्तारीकरण हाती घेण्यात आले. या विस्तारीकरणात स्टेशनच्या आजूबाजूला असलेले अनेक झोपडीधारक विस्थापित झाले आहेत.

वाचा:

विस्थापित झोपडीधारकांना मानखुर्द हिरानंदानी टाटा नगर येथे एमएमआरडीएच्या वतीने घरे देण्यात आली आहेत. यातील एका विस्थापिताला नवीन ठिकाणी घराचा ताबा देण्यासाठी सुनील आटपाडकर या अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच मागितली. इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने या घर मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून दोन लाखांपैकी दीड लाखांचा पहिला हफ्ता घेताना सुनील आटपाडकर याला रंगेहाथ पकडले.

दरम्यान, एमएमआरडीए अधिकाऱ्याचं हे लाचखोरीचं प्रकरण उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here