मुंबई: मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील निष्क्रिय असल्याचा आरोप करत, आज भाजपनं राज्यभर आंदोलन केलं. मुंबईतील आझाद मैदानातही सभा झाली. यात भाजपनं उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. अब की बार बाप-बेटे की सरकार, अशी जोरदार टीका नेते यांनी केली.

मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिला अत्याचाराच्या घटनांवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यात आज भाजपनं राज्यभर आंदोलन केलं. मुंबईत आझाद मैदानात माजी मुख्यमंत्री , पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी भाषण करताना, उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशी टीका केली. महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे? असा सवाल त्यांनी केला.

कितीही चौकशी करा!

यावेळी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे सरकार स्थगिती सरकार असल्याची टीका केली. मागील सरकारच्या योजनांची चौकशी करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला आव्हान दिलं. कितीशी चौकशी केली तरी, काही सापडणार नाही. मागील सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती, हेच ते विसरले आहेत, असंही ते म्हणाले.

मुनगंटीवार काय म्हणाले?

राज्यभर ही आंदोलनं सुरू आहेत…

जी आश्वासनं दिली गेली, त्याचं काय झालं?

उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी देणार होते, त्याचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा…

शेतकऱ्यांच्या बांधावर आश्वासन दिलं गेले. गझनीमध्ये आमिर खान विसरायचा, हे सरकार गझनीचे बाप आहे

हिंगणघाट येथे एका बहिणीला पेटवलं जातं, हे सरकार बघत बसतं.

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, पण महिलांना सुरक्षा देत नाहीत. गृहमंत्री किती दिवसांत या ठिकाणी गेले?

उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीसाठी जातात. सीएए, एनआरसी तुम्हाला समजला. पण तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना समजवा

आम्ही काही चुकलो असेल, तर सरकारमध्ये सुद्धा सोबत होती.

समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचं म्हटलं गेलं, पण शिवसेनेच्या मंत्र्यानं सांगितलं की घोटाळा झाला नाही!

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here