मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग २५ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी १७ जुलै २०२१ रोजी कंपन्यांनी पेट्रोल दरात ३० पैसे वाढ केली होती. एकीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असताना पेट्रोलियम कंपन्यांनी तीन आठवड्यांहून अधिक काळ इंधन दर स्थिर ठेवल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

मुंबईत आज बुधवारीडिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. यापूर्वी कंपन्यांनी १५ जुलै २०२१ रोजी डिझेल दरात १५ पैसे वाढ केली होती.

जागतिक कमॉडिटी बाजारात मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. तेलाचा भाव १.५ टक्क्यांनी वधारला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.२६ टक्क्यांनी वधारून ६७.३२ डॉलर प्रती बॅरल झाला. तसेच १.०१ टक्क्याने वधारून ६९.७४ डॉलर प्रती बॅरल झाला. बाजार बंद होताना डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६८.२९ डॉलर आणि ब्रेंट क्रूडचा भाव ७०.६३ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावला.

याआधीच्या सत्रात सोमवारी डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ४.१३ टक्क्यांनी घसरला आणि ६५.५२ डॉलर प्रती बॅरल झाला होता. त्याचबरोबर ब्रेंट क्रूडचा भाव ३.८८ टक्क्यांनी कमी झाला आणि ६८ डॉलर प्रती बॅरल इतका खाली आला आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडचा भाव ७०.७० डॉलरवर बंद झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here