चिपळूण : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील परचुरी वेल्ये कोंडवीवाडीतील युवकाने राहत्या घरी दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळच्या वेळेत हा प्रकार समोर आला. सचिन नारायण भरणकर (वय- ३६) असे आत्महत्या केलेल्या मृत युवकाचे नाव आहे. (In Chiplun )

या घटनेबाबत संगमेश्वर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत त्याने सोमवारी रात्री घराच्या पडवीतील लाकडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावला. मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आई चंद्रभागा नारायण भरणकर हिला सचिन गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला.

याबाबतची फिर्याद चंद्रभागा भरणकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. यानुसार, पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास हे चंद्रकांत कांबळे करीत असल्याची माहिती आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here