: मित्राच्या लग्नाला जाऊन परत येत असताना रात्री उशीरा झालेल्या अपघातात कोल्हापुरातील दोन युवक जागीच ठार झाले आहेत, तर तिसरा जखमी झाला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात ( News) झाला.

फलटण इथं चालकाचा ताबा सुटल्याने गाडी ३० फूट खोल ओढ्यात गेली. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयानजीक हा अपघात झाला. अनिकेत कुलकर्णी व आदित्य घाडगे असं ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत, तर देवराज माळी हा जखमी आहे.

बुधवारी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी कोल्हापुरातून तीन तरूण खासगी गाडी (एम एच ०९ एफ बी ६७८०) तून मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास सातारकडे गेले होते. ‘कास पठार’ येथे वर्षा पर्यटनानंतर जेवण करून परतत असताना रात्री एकच्या सुमारास पोवई नाका ते मानसी प्राईड हॉटेल दरम्यान न्यायालय इमारतीच्या अलीकडे ३० फूट खोल ओढ्यामध्ये कार गेल्याने अपघात होऊन तीन मुले गंभीर जखमी झाली.

उपचारासाठी त्यांना सातारा डायग्नोस्टिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय २३) रा. मंगळवार पेठ, आणि आदित्य प्रताप घाडगे (वय २३) रा. कसबा बावडा यांचा मृत्यू झाला. देवराज अण्णाप्पा माळी (वय २१) रा. कसबा बावडा हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here