ज्येष्ठ हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंबंधित ट्वीटदेखील केलं आहे. राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यातही जर मुसळधार पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पिक टिकवण्याचं संकट असणार आहे.
खरंतर, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि सर्वदूर भीषण परिस्थिती ओढावली होती. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे.
हवामान खात्याने 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाही तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times