राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८२ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज १६३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण?
मागील वर्षी राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर पुणे शहरात या विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही पुणे शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव झाला होता. जिल्ह्यात आता करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यातच आहेत.
पुणे जिल्ह्यात सध्या १४ हजार ४१९ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याखालोखाल मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times