नवी मुंबईः मनसे शहर अध्यक्ष () यांच्यावर त्यांच्या पत्नीनं गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिक आणि शारिरीक छळ करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे या कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोपही त्यांच्या पत्नीने केला आहे.

वाचाः

गजानन काळे यांचे अनेक महिलांशी संबंध असल्यानं माझ्यावर घरात अन्याय करत असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आमचं लग्न २००८मध्ये झालं. त्यानंतर लग्नाच्या १५ दिवसांनंतर गजानन किरकोळ कारणांवरुन भांडण करु लागले. त्यावेळी ते माझी जात व माझ्या सावळ्या रंगावरुन बोलू लागले, असं त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं आहे.

वाचाः

गजानन यांचे परस्त्रियांसोबत अनैतिक संबंध होते. त्यांना येणाऱ्या फोन व मेसेजवरुन माझ्या ते लक्षात आलं होतं. मी त्यांना वेळोवेळी समजावून सांगायचे. पण ते माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत, तू याच्यात लक्ष घालू नकोस, असं सांगून माझ्यासोबत भांडण करायचे, असं त्यांच्या पत्नीने तक्रारीत नमूद केलं आहे.दरम्यान, या प्रकरणावर गजानन काळे यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये.

माझ्या मुलाच्या हक्कासाठी मी हा निर्णय घेतला असून हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी १३ वर्ष गजानन काळेंसोबत संसार केला. या वर्षांत मी प्रचंड मानसिक, शाररिक त्रास सहन केला. माझ्या मुलालासुद्धा या गोष्टीचा त्रास होत होता. त्यामुळं मला हा निर्णय घेणे गजानन काळेंनी भाग पाडले आहे, असं गजानन काळे यांच्या पत्नीनं म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here