मुंबई: ‘लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची प्रक्रिया किचकट करून राज्य सरकार मुंबईकरांची ‘लोकल कोंडी’ करीत आहे. कमीत कमी मुंबईकरांनी लोकलमधून प्रवास करावा अशीच सरकारची इच्छा दिसते,’ असा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. ( over process of Obtaining Railway Pass)

वाचा:

राज्य भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत हा आरोप केला. ‘लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल मधून प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी भाजपनं सातत्यानं केली होती. त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं. या आंदोलनामुळं राज्य सरकारला जाग आली आणि १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ही परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेली प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. त्यामुळं पहिल्या दिवशी अवघ्या २० ते २२ हजार मुंबईकरांना ही परवानगी मिळवता आली. प्रवासाची परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारनं ज्या अटी घातल्या आहेत, ते पाहता दोन डोस घेतलेल्या सर्व मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी केव्हा मिळणार,’ असा सवाल उपाध्ये यांनी केला. ‘आधीच अनेक निर्बंधांनी वैतागलेल्या सामान्य मुंबईकरांची लोकल कोंडी करणं राज्य सरकारनं थांबवावं, असं आवाहनही उपाध्ये यांनी केलं.

शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय!

‘१५ ऑगस्ट नंतर अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी मंदिरांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मंदिरांवरील निर्बंध उठविण्याची गरज होती. मात्र, हे निर्बंध कायम ठेवून आघाडी सरकारनं आपल्याला हिंदूंच्या भावनांशी देणंघेणं नसल्याचंच दाखवून दिलं आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला. ‘आघाडी सरकारनं शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत १५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय होऊ शकला नाही यावरून हे सरकार शिक्षण सम्राटांच्या हिताला प्राधान्य देतं हे दिसून येतंय,’ असंही ते म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here