पुणे: शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. उद्या, शुक्रवारी पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधणार आहेत. बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला ‘शिवसृष्टी’ प्रकल्प साकारण्याचा संकल्प या निमित्तानं करण्यात येणार आहे. ()

‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम व ‘शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

वाचा:

तिथीनुसार बाबासाहेब पुरंदरे १३ ऑगस्ट २०२१ रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा नागरी सत्कार, कोविड मर्यादांचे पालन करीत मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमात व्हर्च्युअल सहभाग असेल. सुमित्रा महाजन, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येईल. सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्रबुद्धे या गौरव समारंभात सहभागी असतील, अशी माहिती जगदीश कदम यांनी दिली.

वाचा:

बाबासाहेबांचा शंभरीनिमित्त सत्कार करीत असताना शिवसृष्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. या संकल्पाला या कार्यक्रमामुळे बळ लाभेल, असा विश्वास सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांच्या गौरवासाठी स्थापन करण्यात आलेल्या सत्कार समारोह समितीच्या वतीने पुढील वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश आहे, नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम @Shivsrushti Puneofficial या अधिकृत फेसबुक पेजवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

समारोह समितीत दिग्गजांचा समावेश

समारोह समितीत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), भारतरत्न सचिन तेंडुलकर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, गायक शंकर महादेवन, ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, प्रमोद चौधरी, उद्योजक प्रतापराव पवार, क्रेडाई- पुणेचे अध्यक्ष अनिल फरांदे आदींचा समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here