राज्य भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संदर्भात ट्वीट करण्यात आलं आहे. ‘हमने पहलेही कहा था… सोनिया जिसकी मम्मी है, वो ठाकरे सरकार निकम्मी है। असं हे हिंदी भाषेतील ट्वीट आहे. ‘हे नाकर्ते सरकार असून सोनिया गांधी ह्याच ठाकरे सरकारच्या ‘मातोश्री’ आहेत हे आम्ही आधीच सांगितलं होतं,’ असं त्यात म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची माहिती दिली आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या घरी नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. आता सोनियाजींनी सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी ही बैठक होईल. उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी होतील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ‘विरोधकांमध्ये एकजूट आहे आणि ही ताकद आणखी वाढावी यासाठी प्रयत्न केला जाईल,’ असं ते म्हणाले. अर्थात, या बैठकीबाबत काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी त्यास दुजोरा दिलेला नाही.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times