शिवभक्त अशी शिवकुंज याची परिसरात ओळख होती. तसंच त्याला पर्यटनाची आवड असल्याने नुकताच तो जुलै महिन्यात कर्नाटकातील बदामी, तर ऑगस्टमध्ये दांडेली कर्नाटक आणि श्रावणाच्या सुरुवातीला शिवकुंज रामलिंग येथे जाऊन दर्शन घेऊन आला होता. मात्र आज पहाटे झोपेतच असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.
शिवकुंज कुंभार हा १५ फेब्रुवारी २०२१ रोजी विवाहबंधनात अडकला होता. शिवकुंज याच्या अकाली निधनाने नुकताच फुलू लागलेला त्याचा संसार उद्धवस्त झाला आहे. शिवकुंजच्या अकाली जाण्याने कुटुंबीय आणि मित्र परिवाराला धक्का बसला आहे. शिवकुंज याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, अलीकडील काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरुण वयातही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे पुरेसं लक्ष देण्याची गरज अशा घटनांनंतर अधोरेखित होत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times