म.टा. प्रतिनिधी,

सोशल मीडिया प्लॅटफॉम ट्विटरने काँग्रेस नेते खासदार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आणि काही नेत्यांचे आकाऊंट लॉक केले आहे. त्यावर मोठी चर्चा आणि आरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या हँडलमध्ये बदल करून वेगळ्या पद्धतीने राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. तांबे यांनी आपल्या हँडलला राहुल गांधी यांचे नाव दिले असून फ्रोफाइल फोटोही गांधी यांचा ठेवला आहे. केंद्र सरकार आणि यांच्यात मधल्या काळात वाद झाला होता. विरोधकांचा आवाज दडपण्याच्या बोलीवर केंद्र सरकारकडून हा वाद मिटविला गेला असल्याचा आरोपही तांबे यांनी केला आहे. (the congress leader makes changes on to support )

तांबे यांचे हँडल व्हेरीफाईड आहे. त्यामध्ये असे बदल केल्यास ट्विटरच्या नियमानुसार ब्ल्यू टीक काढून घेतली जाऊ शकते. हा बदल करण्यासंबंधी भूमिका मांडताना तांबे यांनी सांगितले की, ‘ट्विटर शेवटी सोशल मीडिया साइट आहे. त्यांनी कारवाई केली म्हणून आमचे फारसे काही बिघडत नाही. आमचे काम सुरूच राहील. मात्र हा प्रकार चुकीचा आहे. याकडे लक्ष वेधणे आवश्यक वाटते.’

क्लिक करा आणि वाचा-

‘केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने वागत आहे’

ते पुढे म्हणाले, ‘गांधी यांचे आकाऊंट लॉक केले तर त्यांच्यासाठी असा बदल करणारे लाखो कार्यकर्ते पुढे येऊ शकतात. मात्र मुद्दा तो नाहीच. ट्विटर आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीने वागत आहे, ती चुकीची आहे, याकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. मधल्या काळात केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद झाले होते. मात्र, आता तो वाद मिटल्याचे दिसून येत आहे. कदाचित विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ट्विटरने केंद्रसरकारला मदत करावी, असेही ठरले असू शकते. त्यामुळेच ट्विटर असे करीत असेल’.

क्लिक करा आणि वाचा-
राहुल गांधी यांच्या आकाऊंटवर कारवाई झाली, ती चुकीचे असल्याचे आणखी एक कारण म्हणजे एका अत्यारित कुटुंबाचे दु:ख राहुल गांधी मांडत होते. अशावेळी सरकारला जाब विचारणे विरोधकांचे कर्तव्यच आहे. मात्र, काहीही करून हा आवाज दाबणे ही लोकशाहीची हत्या आहे. या गोष्टींकडे आम्हाला लक्ष वेधायचे असल्याने ही कृती केली.’ असेही तांबे यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here