लशीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी सहज ई-पास उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने https:/ / epassmsdma.mahait.org ur वेबलिंक उपलब्ध केली आहे. ही बेवसाईट सुरू झाली असून याद्वारे सर्वसामान्य ई-पास मिळवू शकणार आहेत. ही वेबलिंक सर्वच ब्राउझर्सवर उघडू शकणार आहे. नागरिकांनी या बेवलिंकवरून ई-पास डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची आहे.
क्लिक करा आणि वाचा-
असा मिळवा मासिक पास
जेव्हा तुम्ही मासिक पास काढण्यासाठी रेल्वे स्थानकात जाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमझ्ये सेव्ह केलेला ई-पास तिकिट खिडकीवर दाखवावा लागणार आहे. त्यानंतर त्या आधारे तुम्हाला मासिक पास मिळेल. या पद्धतीत ऑफलाइन पडताळणी करण्याची आवश्यकता असणार नाही. एकदा का ऑनलाईन ई-पास मिळवला की मग लशीचे दोन डोस घेऊन १४ दिवस उलटून गेले आहेत अशी व्यक्ती मुंबईतील करू शकणार आहे. ज्या व्यक्तीला पास हवा आहे अशाची लशीबाबतची पडताळणी ही आपोआपच होणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या लिंकमुळे वेगळी पडताळणी करण्याची आवश्यकता नसल्याचेही राज्य सरकारने जाहीर केली आहे. लशीचे दोन डोस घेतली आहे मात्र १४ दिवस झालेले नाहीत अशा व्यक्तीने पाससाठी प्रयत्न केले तरी देखील त्यांना त्यांचा पास १४ दिवस झाल्यानंतर मिळणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times