सिंधुदुर्ग : नितेश राणेंच्या अनेक कारनाम्यांचे पुरावे आपल्याकडे याआधीच आहेत. भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणेंवर असलेल्या अनेक गुन्ह्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पुराव्यानिशी वाचन केले आहे. आता न्याय इथेच होणार कारण हे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राणे पिता पुत्रावरच थेट हल्लाबोल शिवसेनेचे स्थानिक नेते अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेतुन चढवीला.
त्यामुळे तळकोकणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेना विरुद्ध नितेश राणे असा सामना रंगला आहे. गेल्या काही दिवसांआधी नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसह पालकमंत्री उदय सामंत व त्यांच्या भावावर तोफ डागली होती.
सातत्याने शिवसेनेवर टीका भाजपकडून होत असल्याने सेनेने थेट प्रतिहल्ला चढवत नितेश राणेंना ही परमविरांसारखी लूक आऊट नोटीस निघेल अशी भविष्यवणीच करून टाकली. यातून जिल्ह्यात सेना विरुद्ध भाजप असा वाद वाढणार का? यावर राणे काय उत्तर देतात हे पहावं लागणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times