स्वप्रील शिंदे | :

वाई तालुक्यातील धोम येथील संतोष पोळ याने ६ महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह स्वतःच्या घरासमोरील अंगणात आणि फार्म हाऊसमध्ये खड्डे घेऊन गाडले होते. या खळबळजनक हत्याकांडाची (Satara ) पुनरावृत्ती करणारी घटना पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात समोर आली आहे.

व्याहळी ता. वाई येथील महिलेच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना भुईंज पोलिसांनी संशयित आरोपी नितीन आनंदराव गोळे, (वय ३८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान त्याने स्वत:च्या पत्नीचाही खून करुन तिचा मृतदेह डोंगर परिसरात पुरून टाकल्याची धक्कादायक कबुली पोलिसांकडे दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
सातारा येथील संध्या विजय शिंदे (वय ३४) दि. ३१ जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. दरम्यान मंगळवार दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत आसले ता. वाई येथील ऊसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे बांधलेले हात आणि तोंडावरील जखमांवरून ही हत्याच असावी असा प्राथमिक अंदाज बांधून भुईंज पोलिसांनी घटनास्थळापासून तपासाला सुरुवात केली.

मोबाइल लोकेशनच्या आधारावर संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथक रवाना केले. बुधवारी सकाळी कारी, ता. जि. सातारा येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांनी भुईंज पोलीस ठाण्यात दाखल होत संध्या शिंदे यांचा खून नितीन आनंदराव गोळे, रा. व्याहळी, ता. वाई यांनीच केला असल्याची फिर्याद दिली आणि तातडीने संशयित आरोपीला अटक करा अशी मागणी केली.

या तक्रारीवरून भुईंज पोलिसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी स.पो.नि. आशिष कांबळे, डी. बी. पथकातील रविराज वर्णेकर, प्रसाद दुधस्कर, तुकाराम पवार, अतुल आवळे, शिवाजी तोरडमल, आनंदराव भोसले, बापूराव धायगुडे, प्रियांका कदम, दिपाली गिरी-गोसावी, सातारा एल.सी.बी.चे स.पो.नि. रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार उत्तमराव दबडे, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, संतोष पवार, रवी वाघमारे,सचिन ससाणे या सर्वांनी फरार आरोपी नितीन गोळे याच्या शोधासाठी वैराटगड पायथ्याशी असलेला डोंगरदऱ्यात रात्रंदिवस फिरून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचा शोध घेण्यात अपयश आले होते.

पोलिसांना गुंगारा देत आरोपी थेट कर्नाटकातील बेळगाव परिसरात पसार झाल्याची माहिती सपोनि आशिष कांबळे यांना दिनांक ९ ऑगस्ट रोजी मिळाली. त्यांनी स्वतः सहकाऱ्यांसोबत बेळगाव येथे सापळा रचून १० ऑगस्ट रोजी ५ वाजण्याच्या सुमारास ताब्यात आरोपीला घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मयत संध्या शिंदे हिच्या हत्येची कबुली दिली. तसंच त्याची स्वतःची पत्नी मनिषा नितीन गोळे, वय ३५ वर्षे, रा. व्याजवाडी हिचादेखील १ मे २०१९ रोजी खून केला आणि तिचाही मृतदेह पुरून टाकल्याचं पोलिसांना सांगितलं.

दरम्यान, आरोपीला १२ ऑगस्ट रोजी वाईच्या न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here